मुख्यमंत्र्यांचा ’वर्षा’ बंगला डिफॉल्टर यादीत; साडेसात लाखांचे पाणी बिल थकवले!

Foto

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ’वर्षा’ या निवासस्थानाचे तब्बल ७ लाख ४४ हजार ९८१ रुपयांचे पाणी बिल थकले असल्याचे माहितीच्या अधिकारातून मिळवलेल्या माहितीद्वारे उघड झाले आहे. मुख्यमंत्र्यांबरोबच राज्याचे ९ मंत्री आणि ज्ञानेश्वरी, तसेच सह्याद्री अतिथीगृहावर देखील मोठी थकबाकी असल्याचे उघड झाले आहे.

 सर्वसामान्य मुंबईकराने पाण्याचे किंवा वीजेचे बिल थकल्यानंतर पाणी, वीज बंद करून कडक कारवाई केली जात असताना मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना इतकी सूट का दिली जाते, याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगर पालिकेकडून माहितीच्या अधिकाराअंतर्गत मागवलेल्या माहितीद्वारे हे उघड झाले आहे. ७ लाखांहून अधिक रुपयांचे पाणी बिल थकल्याने मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानाला डिफॉल्टरच्या यादीत टाकण्यात आले आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker